header image
header image
header image
header image
header image
Announcements
  • खोरकर (अरुळेकर) रावराणे मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १४ ऑक्टोबर २०१८ रोजी सायं. ४.०० वाजता राजे संभाजी सभागृह, अरुणोदय नगर, मुलुंड (पूर्व), मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.

  • खोरकर (अरुळेकर) रावराणे मंडळ व् कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने " कोकणातील उद्योगाच्या संधी" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान

  • आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचा निकाल 93.37%

  • कौस्तुभ राणे नाही दिवंगत, हरेक हृदयी फक्त चिरंजीव! हरेक सैनिक प्रिय प्राणाहून, हरेक भारतियाची जाणिव!

  • आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाकडून अतिरिक्त ६० विद्यार्थ्यांच्या वाणिज्य शाखेस मान्यता.

अरिमर्दन : गोब्राह्मण गुरुजनानंददायक स्वकुलाकाशे चंद्रेव शोभायमान :

रावराणे समाजाचा इतिहास

केलवाड सारख्या आरवलीच्या मुलुखातून आपल्या सैन्य काबिल्यासह राणा सज्जनसिंह व राणा क्षेमसिंह हे दक्षिणेत हे आले. रावराणे, राणे (गोवा), सुर्वे, खानविलकर हे एकाच शाखेचे असून त्यांचे मूळ पुरुष राजस्थानातील उदयपूर गावी होते. महाराष्ट्रात आल्यावर राण्यांचा अपभ्रंश अथवा अनेक वचनी राणे हे झाले. कोकणात पसरलेल्या या समाजाचे राणा क्षेमसिंह हे महापुरुष असल्याचे नमूद आहे. रावराणे समाज हा राजस्थानमधील मेवाड येथील राजपूत राजवंशाचा घटक असून त्यांचे निशाण लाल रंगाचे आहे. त्यावर सूर्याची आकृती असते. त्यांची उत्पत्ती ही रामाचा पुत्र कुश यांची मानली जाते. त्यांचा कुलदेव एकलिंगजी हे असून बयाणमाता (महेश्वरी), कालिकामाता, महिषासुरमर्दिनी, भैरवी व भवानी यांना सिसोदिया वंशीय कुलदेवी मानतात.

संपूर्ण माहिती करीता

अरिमर्दन : गोब्राह्मण गुरुजनानंददायक स्वकुलाकाशे चंद्रेव शोभायमान :

रावराणे मंडळ : एक अखंड प्रवास...

तळकोकणात वसलेल्या साडे बारा गांवातील रावराणे समाजाचे संघटन व्हावे. यातून स्थानिक जनतेचा शैक्षणिक, सामाजिक विकास व्हावा ह्या उद्देशाने १७ सप्टेंबर १९८२ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर मंडळाची स्थापना झाली. आज मंडळ ३५ वर्षांचे झाले आहे. असंख्य प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर मंडळाने आजतागायत विविध विधायक असे कार्यक्रम राबविले आहेत. यातील प्रमुख्याने उल्लेख करावा असे कार्यक्रम म्हणजे १) वैभववाडी येथे समाजमंदिर २) वाचनालय व पुस्तकपेढी ३) गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव ४) रुग्णवाहिका सेवा ५) महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेची स्थापना व आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची निर्मिती ६) रावराणे समाजाचा कुलवृत्तांत. ह्या विधायक कामांबरोबरच मंडळाने कार्यकर्त्यांच्या संघटनासाठी स्नेहसंमेलन, कार्यकर्ता मेळावा, शैक्षणिक सहल, मार्गदर्शन शिबीर असे कार्यक्रम राबविले आहेत. ह्या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांच्या नियमितपणे बैठका होतात. गावनिहाय कार्यकर्त्यांची फळी उभारून त्याद्वारे कार्यक्रम यशस्वी केले जातात. गेल्या काही वर्षात नवीन कार्यकर्त्यांचा संघ तयार होत आहे. त्याद्वारे महाविद्यालयाच्या विकासासाठी, आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील नेतृत्व गुण वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. विविध शिबीर व सहलींद्वारे त्यांना संघटित करण्याचे प्रयत्न होत आहेत. परिवर्तन हा निसर्ग नियम आहे. बदलत्या काळातील समाजाच्या गरज ओळखून मंडळ आपले पुढील विधायक कार्यक्रम निश्चित करत आहे. रावराणे मंडळाच्या या विकास कार्यात आपला सहभाग आवश्यक आहे. आपण तो निश्चितपणे देऊन समाजाला परत एकदा यशोशिखरावर विराजमान कराल हि खात्री आहे. चला तर या विकास पर्वात सहभागी होऊ या व समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध होऊ या.

कोणत्याही समाजाचा विकास हा केवळ भौतिक सुबत्तेवर अवलंबून नसतो तर तो मनुष्यबळाच्या गुणवत्तेवर, त्यांच्या निष्ठेवर व बांधिलकीवर अवलंबून असतो. यामुळेच 'माणसांचा विकास' हा परवलीचा शब्द बनतो. अशी माणसे घडविण्याचे, त्यांचा विकास करण्याचे काम अव्याहतपणे आपले मंडळ एखाद्या व्रताप्रमाणे करत आहे. ते पुढेही घडत राहील हा मला विश्वास आहे.

श्री.रघुनाथ फत्तेसिंग रावराणे

रावराणे समाजाचा इतिहास दैदिप्यमान असा आहे. आपल्या समाजाचे मूळ हे मेवाडपंथी राजपूत घराण्यामध्ये आढळते. महाराणा प्रतापसिंह यांना दैवत मानणारा आपला समाज अनेक वर्ष देशाचे नेतृत्व करत होता. आपण एका पराक्रमी घराण्याचे वंशज आहोत याचा आपणास नेहमीच सार्थ अभिमान असला पाहिजे. रावराणे समाजाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी भावी पिढी आपले योगदान देईल ह्याची मला खात्री आहे.

श्री दयानंद पांडुरंग रावराणे